जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य शाखेचे तहसीलदार सुरेश थोरात यांच्या उपस्थितीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिना’ निमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी अव्वल कारकून गणेश साळी, महसूल सहाय्यक प्रकाश शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.