जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. हा पाऊस जिल्ह्यातील पीकांना जीवदान ठरत आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 50.54 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 628.22 मिलीमीटर इतके असून मागील वर्षी 20 जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या 22.78 टक्के म्हणजेच 145.22 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी 322.59 मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या 50.54 टक्के इतका पाऊस पडला आहे.
जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 69.74 टक्के इतका पाऊस अमळनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच 40.69 टक्के पाऊस भुसावळ तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 20 जुलै रोजी एका दिवसात 5.69 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (20 जुलै, 2020) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका – 342.72 मिलीमीटर (50.86 टक्के), जामनेर- 323.30 मि.मी., (46.95), एरंडोल- 284.50 मि.मी. (47.15), धरणगाव – 307.83 मि.मी. (45.37), भुसावळ – 244.60 मि.मी. (40.69), यावल – 282.05 मि.मी. (43.89), रावेर – 318.43 मि.मी. (49.27), मुक्ताईनगर – 297.30 मि.मी. (52.08), बोदवड – 274.58 मि.मी. (40.84), पाचोरा – 330.46 मि.मी. (51.22), चाळीसगाव – 356.32 मि.मी. (55.88), भडगाव – 335 मि.मी. (51.83) अमळनेर – 410.60 मि.मी. (69.71), पारोळा – 302.10 मि.मी. (48.74), चोपडा – 429.06 मि.मी. (65 टक्के) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 50.54 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.