चहाच्या दुकानासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ओम चेंबर शेजारी असलेल्या चहाच्या दुकानासमोरून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी २४ जून रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यश दिपक सुर्यवंशी (वय-१९) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. यश सुर्यवंशी हा शुक्रवारी २३ जून रोजी सकाळी १० वाजता कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ डीझेड ६६९) ने शहरातील ओम चेंबर येथे आलेला होता. त्यावेळी त्याने चहाच्या दुकानासमोर दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. सायंकाळी ६ वाजता यश हा घरी जाण्यासाठी निघाला असता त्याला जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यानंतर त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळाली नाही. अखेर शनिवारी २४ जून रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस  नाईक प्रदीप पाटील करीत आहे.

Protected Content