चंद्रपूर जिल्हयात वाघाच्या हल्लेत दोन जण ठार

चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चंद्रपूर जिल्ह्यात वाघच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे. कळमना जंगलात एका वाघाने दोन वेगवेगळया घटनेत दोन जणांचा बळी घेतला आहे. 14 मे रोजी पहिल्या घटनेत बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता गावातील रहिवासी 59 वर्षीय वामन गणपती टेकाम हे कळमना जंगलात बकऱ्या चरायला घेऊन गेले होते, मात्र त्यावेळी गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले व परत वनकर्मचारी गस्तीवर निघाले. मात्र ते जाताच टेकाम हे कळमना जंगलातील वनखंड क्रमांक 514 ए मध्ये बकऱ्या चरायला गेला, बकऱ्या चराई करीत असताना दुपारी वाघाने टेकाम यांच्यावर हल्ला करीत ठार केले.
सदर घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दुसऱ्या घटनेत चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथे 34 वर्षीय अंकुश श्रावण खोब्रागडे हा आपल्या शेतात रात्री झोपायला गेला होता, मात्र मध्यरात्री अंकुश ला शौचास लागली, अंकुश हा शेत परिसराच्या नाल्याजवळ शौचास बसला, त्यावेळी त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने अंकुश वर हल्ला करीत ठार केले. दुसऱ्या दिवशी अंकुश हा घरी न परतल्याने त्याचा भाऊ शेतात गेला, शेतातील झोपडीमध्ये अंकुश ची चप्पल व मोबाईल मिळाला. मात्र, तो कुठे आढळला नाही, त्यावेळी शेतातील नाल्याच्या घाटावर अंकुश चा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असलेला मृतदेह कुटुंबाला आढळला. पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली, त्यावेळी गावातील नागरिकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला, वाघाचा बंदोबस्त करणार ही मागणी मान्य केल्यावर बऱ्याच वेळाने अंकुश चा मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविण्यात आला. दोघांना वनविभागाने आर्थिक मदत दिली आहे.

Protected Content