गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात बुद्धपौर्णिमा साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात शुक्रवार ५ मे रोजी बुद्धपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, संचालक शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्याहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

यावेळी रांगोळी काढून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्यात. याप्रसंगी गोदावरी नर्सिग महाविद्यालयातील प्रा.मनोरमा कश्यप, प्रा.स्वाती गाडेगोने यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. उपस्थीतांनी गौतम बुद्धांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. जीवनाविषयीचे विचार आणि तत्व याबद्दल बुद्धांनी जगाला दिलेली शिकवण मान्यवरांनी सांगितली. तसेच बुद्धपौर्णिमेचे महत्वही विशद करण्यात आले.

Protected Content