गोदावरी एमबीए महाविद्यालयात ‘समुपदेशन केंद्र’

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात एमबीए प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

 

डीटीई मुंबई कार्यालयातर्फे नुकतीच ‘एमबीए-एमएच सीईटी’ची लिंक चालू झालेली असून एमबीए करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सीईटी देणे आवश्यक आहे.  विद्यार्थ्यांना ‘एमबीए-एमएच सीईटी’चा फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात समुपदेशन  केंद्र चालू केलेले आहे. तरी याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी  प्रा. रोशनी शुक्ला (8329382453) , हेमांगी पाटील (9172059353) या नंबरवर संपर्क साधावा.

Protected Content