कोथळीत दोन बंद घर फोडून ऐवज लांबविला

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील दोन बंद घर फोडून चोरट्यांनी ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, निलेश निनु वराडे (वय-४२) रा. कोथळी ता. मुक्ताईनगर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या काकू आशा रमेश वराडे या त्याच्या घरासमोर राहतात. १४ मे रोजी रात्री १० वाजता काकू यांनी घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार १५ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. शिवाय गावातील पंकज चौधरी यांच्या घरात देखील चोरी झाली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निलेश वराडे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जाधव करीत आहे.

Protected Content