किरकोळ कारणावरून महिलेच्या डोक्यात टाकली फरशी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी नगरात राहणाऱ्या महिलेशी वाद घालून मी पण इथेच राहतो असे सांगून डोक्यात फरशी टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, शहरातील शिवाजी नगरात भावना योगेश पाटील (वय २८) या महिला वास्तव्यास आहे . मंगळवारी २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिला घरी असतांना योगेश कौतिक पाटील हा महिलेच्या घरी गेला. त्याने महिलेला मी पण येथेच राहतो म्हणत वाद घालू लागला. महिलेने त्याला विरोध केला असता, योगेश पाटील याने महिलेचे के स धरुन तीला जमिनीवर आपटले. तसेच सोबत आणलेल्या फरशीचा तुकडा महिलेच्या डोक्यात हाणून त्यांना गंभीर जखमी केल. महिलेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता योगेश कौतिक पाटील रा. पाथरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजीव जाधव हे करीत आहे.

Protected Content