कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने एरंडोल काँग्रेसतर्फे जल्लोष

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील राष्ट्रीय काँग्रेस कमिटी,ओ.बी.सी.सेल अल्पसंख्यांक यांच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाल्यामुळे जल्लोष करण्यात आला.

सुरुवातीला शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले.त्यानंतर पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,डॉ. फरहाज बोहरी,प्रा.आर.एस.पाटील,ओ.बी.सी.सेल तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष कलीम शेख,ओ.बी.सी.सेल उपाध्यक्ष दिपक पाटील,एस. टी.संघटना तालुकाध्यक्ष संतोष मोरे,अंजुम सैयद,बबन वंजारी,मदन भावसार,डॉ.प्रशांत पाटील,ओ.बी.सी.सेल जिल्हा उपाध्यक्ष सांडू शेख, डॉ. जाकिर शेख,मोहसीन शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content