चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील ओढरे ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एक पदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली. यात सुशीला पवार या ग्रामपंचायतीच्या सदस्यापदी त्या विराजमान झाल्या आहे.
तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी १८ मे रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली. यावेळी ओढरे येथील एका जागेसाठी देखील मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सुशील रामसिंग पवार ह्या एका जागेवर २०७ मताधिक्याने निवडून आल्या आहे. यामुळे परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्या माजी सरपंच पुष्पा जगन पवार यांच्या मोठ्या जाऊ तर रामसिंग परमा पवार ( वरिष्ठ क्लार्क एसटी महामंडळ, जळगाव) यांच्या त्या पत्नी आहे.
याप्रसंगी पॅनल प्रमुख नवलसिंग राठोड, शिवाजी चव्हाण, हिरामण पवार,भीमा पवार, नामदेव चव्हाण, सरपंच सावित्रिबाई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या भारती राठोड, मनीषा राठोड, विलास जाधव, गजानन चव्हाण, जगन पवार, वसंत चव्हाण, शांतराम चव्हाण, विनोद राठोड, गोरख जाधव, दगडूसिंग चव्हाण, नवनाथ पवार, अनिल चव्हाण आदींची उपस्थिती होती.