एरंडोलमध्ये पालिका कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी.

एरंडोल-रतीलाल पाटील |  एरंडोल नगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे औचित्य साधून नगरपालिकेतील सर्व कर्मचार्‍यांसाठी आरोग्य तपासणी  शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या तसेच  कर्मचार्‍यांना आरोग्यविषयक सवयी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 

याप्रसंगी नगरपालिकेच्या एकूण ८० कर्मचार्‍यांनी शिबिराचा लाभ घेतला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपदा मित्र म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षित युवक व युवतीचा सन्मान करण्यात आला तसेच सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जनास नगरपालिकेला सहकार्य करणार्‍या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक सतिश गोराडे, प्रमुख पाहुणे सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ.नरेंद्र ठाकुर होते.

 

याप्रसंगी वैद्यकीय असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा , डॉ.सुयश पाटील, डॉ. संदीप गांगुर्डे ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अमोल पाटील,  समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राधिका पालवे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा शाहिद मुल्लाजी  , महालॅब ची  टीम,केशव  ठाकूर आरोग्य सेवक, पुनम धनगर, योगिता परदेशी, धनगर परिचारिका ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांनी प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करून कर्मचार्‍यांना आरोग्याच्या बाबतीत जागृत केले.

 

शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी , डॉ. नरेंद्र ठाकूर यांचे सहकार्य लाभले तसेच प्रमुख मार्गदर्शन मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन हितेश जोगी यांनी केले तर आभार डॉ.अजित भट यांनी मानले. कार्यक्रमास एरंडोल नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content