एक कारण नसतांना तरुणाला एकाकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लाकूडपेठ चौकात तरुणाला दुसऱ्या एका तरुणाने दारुच्या नशेत शिवीगाळ करत लाथबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील मारोती मंदिरामागे रोहित संजय आकोलकर हा तरुण राहतो. रोहित हा मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लाकूडपेठ चौकात धर्मविर डेअरीजवळ उभा होता, यादरम्यान काही एक कारण नसतांना गेंदालाल मिलमधील अल्ताफ नावाच्या तरुणाने दारुच्या नशेत शिवीगाळ करत रोहित यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी काहीतरी वस्तू रोहित याच्या डोळ्याजवळ तसेच डोक्याच्या मागील बाजूस मारुन दुखापत केली. या घटनेप्रकरणी रोहित याने दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या अल्ताफ नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे हे करीत आहेत.

Protected Content