आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे पिंक ऑटो घेणाऱ्या महिलांना प्रत्येकी १० हजारांची आर्थीक मदत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मराठा प्रतिष्ठानमार्फेत पाच पिंक ऑटो रिक्षाचे विरतरण शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते गुरूवारी २२ जून रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले. यावेळी प्रत्येकी पिंक ऑटो रिक्षा घेणाऱ्या महिलांना प्रत्येक १० हजारांची आर्थीक मदत देण्याची ग्वाही आमदार राजूमामा भोळे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, मोटर वाहन निरीक्षक हेमंत सोनवणे, उद्योजक सुबोध कुमार चौधरी, पंजाब नॅशनल बँकेचे शाखाधिकारी सुयोग देसले, टॅक्सी युनियनचे रज्जाक गणी खान, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे उपस्थित होते.

शहरातील महिला रिक्षा चालवण्याचा व्यवसाय अतिशय उत्तमरीत्या करत असून शहराच्या नावलौकिकास भर पडत आहे. त्याकरता त्यांचे कौतुक केले तेवढे थोडे आहे, असे उदगार आमदार राजूमामा भोळे यांनी याप्रसंगी केले. महिलांकरता स्वतंत्र रिक्षा थांबा देण्याबाबत महानगरपालिका परिवहन अधिकारी या सर्वांसोबत चर्चा करून लवकरच मार्ग काढू तसेच समाजाप्रती काही देणं लागतो याची जबाबदारी घेऊ यापुढे मराठी प्रतिष्ठानमार्फत पिंक ऑटो रिक्षा घेणाऱ्या १०० महिलांना स्वतंत्ररित्या १० हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सदैव पिंक आटो रिक्षा चालवणाऱ्या महिलांच्या पाठीशी असून रिक्षा चालविताना ज्या काही समस्या आल्यास त्यांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी या प्रसंगी केले.

टॅक्सी युनियनचे रज्जाक गणी खान व रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांनी पण आपले विचार व्यक्त केले. पिंक ऑटो महिलांचे लायसन्सचे काम करणारे किरण अडकमोल व महिलांना ट्रेनिंग देणारे नूर शेख यांचा याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महिला पिंक आटो चालक संगीता बारी व पूनम गजरे यांनी आपले अनुभव कथन केले. आज वितरित करण्यात आलेल्या पाच महिलांना प्रत्येकी वीस हजार रुपयाची आर्थिक मदत उद्योजक अजय ललवाणी यांनी केली आहे.

यावेळी पुनम वानखेडे, विजेता सोनवणे, सुनीता सपकाळे, जयश्री पाटील, धनमाला सुरडकर यांना पिंक रिक्षा वाटप करण्यात आली. याप्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे,विश्वस्त निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार, तांबापुर फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.

Protected Content