आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाची अप्पर आयुक्तांनी केली पाहणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |येथील जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत वैयक्तिक लाभ मिळालेल्या तसेच बचत गटांच्या योजना उद्घाटन करीता अप्पर आयुक्त संदीप गोलाईत तसेच जिल्हा आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे आदींच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.

 

यावल येथील जिल्हा प्रकल्प कार्यालय अंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांच्या माध्यमातून आदिवासी स्वयंसहायता समूह बचत गट डोंगर कठोरा या बचत गटाचे केळीच्या खोडापासून जागा बनवणे तसेच बिराज तडवी यांना वैयक्तिक लाभ अंतर्गत मिळालेल्या अनुदानातून त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचे उद्घाटन त्याचबरोबर केन्द्र शासनाच्या सेंट्रल किचन कार्यक्रमांतर्गत शासकीय आश्रम शाळा डोंगर कठोरा येथील अत्यंत वेगाने सुरू असलेल्या सेंट्रल किचन कार्यक्रमाच्या ईमारती कामाची ही पाहणी दिनांक २३ / ०५ / २०२३   रोजी आदीवासी विभागाच अप्पर आयुक्त तसेच प्रकल्प अधिकारी यावल यांच्याद्वारे करण्यात आली.

 

नंतर  धानोरा येथील आई स्वयंसहायता समूह बचत गट यांना न्युक्लियस बजेट योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभातून त्यांनी सुरू केलेल्या टेन्ट हाऊस व्यवसायाची पाहणी आणि उद्घाटन अप्पर आयुक्त  यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकल्प कार्यालय यावल येथील कामकाजा बद्दल तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांच्या अंमलबजावणी बद्दल  अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी जिल्हा आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांची केलेल्या प्रशासकीय कामांच्या अमलबजावणी चे विशेष कौतुक केले.              यावेळी त्यांच्या सोबत यावलच्या जिल्हा आदीवासी प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरेसह विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content