…आणि निराश शेतकर्‍याने स्वत:च्या तीन एकर शेतातील गहू जाळला

नांदुरा-पुरूषोत्तम भातूरकर | एकीकडे आसमानी फटक्याने शेतकरी हैराण झालेला असतांना वीज वितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून एका शेतकर्‍याने आपल्या तीन एकर शेतातील गहू जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शेगाव तालुक्यातील चिंचोली ग्राम येथील शेगावी राहणार्‍या रमेश काशीराम सानप या शेतकर्‍याने आपल्या शेतातील उभा असलेला तीन एकर गहू अक्षरश: जाळून टाकला. याला कारण असे की हा गहू पेरल्यानंतर वारंवार तक्रारी देऊन सुद्धा महाराष्ट्र विद्युत विभागाकडून विद्युत पुरवठा होत नव्हता. त्यामुळे गव्हाला पाणी न देता आल्यामुळे हा संपूर्ण गहू पूर्णपणे वाढू शकला नाही. यामध्ये शेतकर्‍याचे जवळजवळ पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून या शेतकर्‍याने राष्ट्रपती पासून तहसीलदारापर्यंत तक्रार सुद्धा केलेली आहे.

वारंवार विद्युत मंडळाच्या चकरा मारून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. यामुळे हा शेतकरी निराश झाला होता. यातच स्वत:ला शेतकर्‍यांचे कैवारी म्हणुन घेणारा एकही शेतकरी नेता त्यांच्या व्यथा जाणायला आला नाही. विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे दर महीन्याला न चुकता बिल भरुन देखील विज मिळत नसल्यामुळे हे नुकसान झाले असे शेतकर्‍याचे म्हणने असुन आता त्यांनी जिवनयात्रा संपवण्याची परवानगी शासनाला मागीतली आहे.

Protected Content