अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  जळगाव शहरातील पिंप्राळा रोड परिसरातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सावखेडा शिवारातील पिंप्राळा नगर रोड परिसरातून शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ८ वाजता सुमारास बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. दोघांकडे वाळू वाहतुकीच्या कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. या संदर्भात पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या संदर्भात पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादिवरून दोन्ही ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवार २३ जून रोजी रात्री १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content