अविश्वास प्रस्ताव सादर करण्यापुर्वीचं उपसरपंच यांचा राजीनामा

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्याविरुद्ध दहा सदस्य यावल तहसील कार्यालयात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यास आले होते व येथे तहसिलदारांकडे कारवाइ सुरू असतांनाचं उपसरपंच यांनी स्व:हाच राजीनामी दिला आहे.               गावातील विकास कामांना वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करून अडथळा निर्माण करण्याचे काम उपसरपंच करत असल्या वरून अविश्वास प्रस्ताव दाखल होत होता. मात्र, त्यांनी स्वताच सरपंय यांच्याकडे राजीनामा दिल्याने पुढील कार्यवाही थांबली आहे.

हिंगोणा तालुका यावल येथील ग्रामपंचायत उपसरपंच भैरवी भरत पाटील यांच्या विरोधात बुधवारी दहा सदस्यांनी यावल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.                   हिंगोणा ग्रामपंचायतचे उपसरपंच हे गाव विकासासाठी असलेल्या सार्वजनिक हिताच्या शासन पुरस्कृत योजनांना विरोध करतात तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या विकास कामांना वेगवेगळे अर्ज करून अडथळा निर्माण करतात असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आले असुन या अविश्वास प्रस्तावामध्ये अविश्वास दाखल करण्याच्या प्रस्तावाची कार्यवाही सुरू असतांनाचं उपसरपंच भैरवी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच रूक्साना तडवी यांच्या कडे सादर केला.                                      भैरवी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने तहसील कार्यालयात सुरूअसलेल्या अविश्वासाची पुढील कार्यवाही थांबवण्यात आली असल्याचे वृत आहे .                                अविश्वास प्रस्ताव करीता ग्रामपंचायत सरपंच रूक्साना फिरोज तडवी ग्राम पंचायत सदस्य सारिका किशोर सावळे,राजेंद्र महाजन, कविता विष्णू महाजन,रूपाली भरत नेहते, कपिल खाचने, छबु खुदाबक्ष तडवी, छबू मैताब तडवी, शांताराम मांगो तायडे व कमल भगवान तायडे यांची उपस्थिती होती. या संदर्भात उपसरपंच भैरवी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता राजीनाम्या संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केले असता , उपसरपंच यांनी आपण सरपंचाकडे दिलेल्या आपला राजीनामा मागे घेणार असल्याची माहिती उपसरपंच पाटील यांनी दुरध्वनीवरून प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले .

Protected Content