अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवारी दुपारी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी १९ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेच्या सायगाव येथे कामासाठी गेली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केले. दरम्यान, ही बाब पिडीत मुलीच्या आजीला माहित झाल्यावर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी १६ जून रोजी दुपारी १ वाजता  पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मेहुणबारे पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक  प्रकाश चव्हाण करीत आहे.

Protected Content