अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या डॉनवर गुन्हा दाखल

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेख फिरोज शेख युनूस उर्फ डॉन यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

१७ जून रोजी सकाळी ७ वाजता आणि २० जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलीचा संशयित आरोपी शेख फिरोज शेख युनूस उर्फ डॉन याने पाठलाग केला. त्यांनंतर तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिडीत मुलीने पालकांना सांगितला.त्यानुसार पालकांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी शेख फिरोज शेख युनूस उर्फ डॉन याच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

Protected Content