अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावातील चौबे पेट्रोल पंपानजीक उड्डाणपुलावर भरधाव ॲपे रिक्षाची दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. या अपघात प्रकरणी सोमवारी ८ मे रोजी रात्री १० वाजता ॲपे रिक्षावरील अज्ञात चालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप विश्वनाथ देवरे (वय-५७) रा. मेहरूण जळगाव असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, दिलीप विश्वनाथ देवरे हे मेहरूण परिसरात वास्तव्याला होतो. २ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एमएच १९ डीके ४६६५) ने भुसावळ येथून जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. नशिराबाद गावाजवळील चौबे पेट्रोल पंपासमोरी उड्डाण पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी ॲपेरिक्षा क्रमांक (एमएच १९ बीएम ३७५७) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दिलीप देवरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी अखेर सोमवारी ८ मे रोजी रात्री १० वाजता ॲपेरिक्षावरील अज्ञात चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

Protected Content