अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दाचा जागीच मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील प्रकाश नगरात राहणाऱ्या ६८ वर्षीय वृध्द मॉर्निंग वॉक करत असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १६ मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव रोडवर घडली आहे. या घटनेबाबात जामनेर पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. वसंत दत्तात्रय सैतवाल (वय-६८) रा. प्रकाश नगर, जामनेर असे मृत वृध्दाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, वसंत सैतवाल हे आपल्या परिवारासह जामनेर शहरातील प्रकाश नगरात वास्तव्याला होते. मंगळवारी १६ मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले. जळगाव रोडने घरी परतत येत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात चालक वाहन घेवून पसार झाला होता. मयत वृध्द हे जामनेर शहरातील प्रसिद्ध आशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील सैतवाल यांचे वडील होत. या घटनेबाबात जामनेर पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांची अंतिम यात्रा आज संध्याकाळी 5 वाजता आशा हॉस्पिटल प्रकाश नगर इथून निघणार आहे.

Protected Content