जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून रावेरच्या रंजना प्रल्हाद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी मधू काटे यांचे नाव चर्चेत असतांना अनपेक्षितपणे लालचंद पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
आज जिल्हापरिषद निवडणूक होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून रावेरच्या रंजना प्रल्हाद पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी अनपेक्षितपणे लालचंद पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या जयश्री अनिल पाटील आणि रेखाबाई दीपक राजपूत या दोघांचे तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे मनोहर गिरधर पाटील आणि नानाभाऊ महाजन यांनी अर्ज घेतले आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1627246867417043/