
नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालाचा कौल भाजपाच्या विरोधात गेला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना घरच्या मैदानावर मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही भाजपाला पराभवाला सामोरं जावे लागले आहे. येथे काँग्रेस उमेदवाराने विजय मिळवला आहे. नागपूरातील भाजपाच्या पिछेहाटीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरले जात आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे. दरम्यान, धुळ्यात भाजपनं मुसंडी मारलीय. जिल्हा परिषद निकालांमध्ये धुळ्यात काय होणार याची सर्वांनाच उत्सुक्ता होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि फडणविसांनी धुळ्यातल्या प्रचारात विशेष लक्ष घातले होते. त्याचाच परिणाम म्हणजे धुळ्यात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे.