Home Cities जळगाव जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा वार्षिक प्रशासन अहवाल मंजूर

जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा वार्षिक प्रशासन अहवाल मंजूर


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) नियम १९६४ मधील नियम ९ अन्वये जळगाव जिल्हा परिषदेचा सन २०२४-२०२५ या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल मंजूर करण्यात आला आहे.

हा अहवाल जिल्हा परिषद ठराव क्रमांक १२१३ अन्वये दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. संबंधित वर्षातील विविध विकासकामे, योजनांची अंमलबजावणी, आर्थिक बाबी तसेच प्रशासनिक कामकाजाचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, अहवाल नियमानुसार मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound