यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील गिरडगाव जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी दिपक सुरेश बारेला यांचे आजोबा नाहरसिंग खजान बारेला यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेला डिजीटल एच.डी.टी.व्ही.भेट दिली तर ग्रामस्थांनी वर्गणी करून आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा डिजीटल होण्यासाठी मदत केली.
या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आशा तडवी तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त, मुख्याध्यापक ह. भ. प. पुंडलिक देवाजी तायडे होते, यावेळी उपसरपंच शकीला तडवी पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा कार्यअध्यक्ष व यावल तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील, वाघोदेचे माजी सरपंच प्रभाकर पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक सुरेश पाटील, सुधाकर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पाटील, मुख्याध्यापक जितेंद्र पाटील, कविता मॅडम, दीपक पाटील, प्रवीण पाटील, महारु अन्वर तडवी, हमीद तडवी, पांडुरंग पाटील, दिलीप बारेला, केंद्रप्रमुख सोनार सर व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा डिजीटल व्हावी म्हणून प्रजासत्ताक दिनी भेट केली एच.डी.टी.व्ही
10 months ago
No Comments