रावेर प्रतिनिधी । शहरातील श्री.जय झुलेलाल सिंधी समाज सेवा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही “श्री झुलेलाल जयंती चेट्रीचंड्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ०४ एप्रिल व ०५ एप्रिल रोजी सिंधी समाज मंदिर रावेर येथे विवीध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शनिवार ६ रोजी दुपारी १२ वाजता श्री. बहेराणा साहेबांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ५ वाजता भगिनी मंडळाच्या वतीने कलशयात्रा काढण्यात आली. ६ वाजेपासुन भगवान श्री.झूलेलाल यांची पालखी मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरुन काढण्यात आली. रात्री मिरवणूक समाप्तीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वितेसाठी सिंधी समाज अध्यक्ष. विजय मनवानी, धनराज चंदवानी, किशोर तोलानी, महेश खटवानी, सुनिल जयसिंघानी, नरेन्द्र मिरानी, पप्पुशेठ चंदनानी, रमेशलाल गनवानी, अनिल कोटवानी, पवन सुखवानी, जितेन्द्र मनवानी, मनिष तोलानी, जवाहर चंदवानी, अमर तलरेजा, दिपक रेवतानी, विनोद खानचंदानी, नरेश आडवानी, यांसह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.