भुसावळ प्रतिनिधी । वारकरी संप्रदायात देहाची जात पाहिली नाही तर अंत:करणाची जात पाहिली आहे. या संप्रदायातील मंदीराचा पाया म्हणजे ज्ञानोबाराया तर कळस म्हणजे तुकोबा आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित करून ज्ञानोबांनी या संप्रदायाचा पाया रचला त्यांची ही शिकवण आपण पाळली पाहिजे असे कार्य झेंडू महाराज करतात, असे प्रतिपादन सुधीर पाटील यांनी केले.
श्री सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्था व श्री महालक्ष्मी ग्रुप तर्फे महालक्ष्मी मंदिर खडका रोड येथे श्री सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर यांच्या २१९ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना म्हणाले की, सर्व समाजात जाती-धर्मापेक्षा ऐक्याची भावना आपल्या मनात असली पाहिजे, वारकरी संप्रदायात प्रबोधनाच्या माध्यमातून ऐक्याचा संदेश सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर यांनी त्या काळी दिला आहे.
झेंडूजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती पत्रिका निर्माण करावी: वसंत भोगे
आधुनिक महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासात झेंडूजी महाराज बेळीकर यांचे योगदान मोठे असून त्यांच्या जीवनावर आधारित माहिती पत्रिका निर्माण करण्याचे कार्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु करावे अशी सूचना महालक्ष्मी ट्रस्टचे सदस्य वसंत भोगे यांनी केली. शिशिर जावळे, वसंत कोलते, दिनेश भंगाळे या मान्यवरांनी आपआपली मते मांडली.
प्रसंगी महालक्ष्मी ट्रस्टचे सुधीर पाटील, सुरेश बऱ्हाटे, मनोहर बऱ्हाटे, वसंत भोगे, झेंडूजी महाराज बेळीकर संस्थेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे, संत तोताराम महाराज मंडळ जळगांवचे अध्यक्ष हेमंत भंगाळे, प्रा.धीरज पाटील, सुपडू भंगाळे, पंडित भिरुड, प्रशांत देवकर, शिशिर जावळे, वसंत कोलते, चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, बाबुराव भंगाळे, अभिषेक पाटील, लीलाधर भारंबे, मधुकर लोखंडे, किशोर पाटील, दीपक झांबरे, संदीप लोखंडे, धर्मराज देवकर, नितीन लोखंडे, दीपक झांबरे, प्रल्हाद नेहेते, दिलीप महाजन, किरण पाटील, उपस्थित होते.
वधू-वर परीचय पुस्तिकेबाबत नियोजन
श्री सदगुरू झेंडुजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्था, भुसावळ मंडळाच्या वतीने आयोजित वधू-वर परीचय पुस्तिका नियोजन संदर्भात महत्त्वाची बैठक झाली. वधू आणि वरांचा फोटो आणि माहितीतून परिचय करून देण्यात येणार आहे. लेवा समाजातील उच्चशिक्षित, अल्पशिक्षित, प्रथम वधू-वर, घटस्फोटीत, विधवा, विधूर, प्रौढ व इतर वधू वरांचे विवाह जुळविण्याकरिता मंडळाचे कार्य अविरत सुरू असते. समाजबांधवांनी १० जानेवारी पर्यन्त परिचय पत्रक देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.