Home Cities जळगाव जि.प. सीईओंची बदली : डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती !

जि.प. सीईओंची बदली : डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती !

0
52

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया हे नवीन सीईओ बनणार आहेत. कोविडच्या काळात डॉ. पाटील यांच्याकडे जिल्हा परिषदेची प्रशासकीय सूत्रे होती. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली.

दरम्यान, डॉ. पाटील यांच्या जागी येणारे डॉ. पंकज आशिया हे भिवंडी-निजामपूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे जिल्हा परिषदेची सूत्रे येणार आहेत.

 


Protected Content

Play sound