युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

yuvraj

 

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्याने हा निर्णय जाहीर केला. तसेच, निवृत्तीमागची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

 

मुंबईत आयोजित कार्यक्रमात युवराजसिंगने ही घोषणा केली. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता. 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिले आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणाऱ्या परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली होती.

Add Comment

Protected Content