Home क्रीडा युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 

युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 

0
128

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे खेळ आणि क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सलग पाचव्या वर्षी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी जी.एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव येथे पार पडणार असून, जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये या स्पर्धेचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेचे आयोजन युवासेनेतर्फे करण्यात येत असून, त्याला जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनची मान्यता लाभलेली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा कुमार गटासाठी असून, यामध्ये जिल्ह्यातील 9 मुलांचे आणि 5 मुलींचे अशा एकूण 14 संघांचा समावेश आहे. सुमारे 168 हून अधिक युवा खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य आजमावणार आहेत.

स्पर्धेचे तांत्रिक आयोजन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. दरवर्षी ही स्पर्धा खेळाडूंमध्ये उत्साह आणि स्पर्धात्मकता निर्माण करत असल्याने, यावर्षीही जिल्ह्यातील बास्केटबॉलप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता आहे.

युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया आणि लोकसभा युवाधिकारी प्रीतम शिंदे यांनी जळगावकर नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. अशा उपक्रमांमुळे युवा पिढीमध्ये क्रीडाविषयक जाणीव वाढते तसेच जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीही अधिक बळकट होते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound