युतीमुळे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप संकटात

jagtap

मुंबई प्रतिनिधी । लोकसभा निवडणुका संपताच, सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी जगतापांचा मार्ग खडतर असणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

नगर शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. कारण, २०१४ ची निवडणूक सोडली तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड सलग २५ वर्षे आमदार राहिले आहेत. मात्र गेल्यावेळी भाजप-शिवसेनेमध्ये युती झाली नसल्याने मताची विभागणी झाल्यामुळे जगताप यांच्या फायदा झाला. राठोड यांचा पराभव झाला. मात्र यावेळी परिस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे जगताप यांना मोठा संघर्ष करावा लागणार असून ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे जर जगताप राष्ट्रवादीतच राहिले तर राठोड यांची उमदेवारी निश्चित समजली जात आहे. तसेच यावेळी पुन्हा जगताप विरोधात राठोड असा सामना पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Protected Content