मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | यूट्यूबने भारतातील चॅनेलवर मोठी कारवाई केली आहे. यूट्यूबने आपल्या ॲपमधून तीन महिन्याच्या कालावधीत २२.५ लाख व्हिडीओ हटवले आहे. ३० देशात ही कारवाई यूट्यूबने केली आहे. त्यामध्ये भारतात सर्वात मोठी कारवाई केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये सिंगापूरमधील १२.४३ लाख व्हिडिओ, तर अमेरिकेतील ७.८८ लाख व्हिडिओ डिलीट करण्यात आले होते. आपल्या कम्युनिटी नियमावलीचे पालन या चॅनल्सने केले नव्हते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
जगभरातील ९० लाख व्हिडीओ या तीन महिन्याच्या कालावधीत यूट्यूबने हटवले आहे. यामधील ५३.४६ टक्के व्हिडिओंना एकही व्ह्यू मिळाला नव्हता. यासोबतच यूट्यूबने स्पॅम कंटेंट शेअर करणारे सुमारे दोन कोटी चॅनल्सही काढून टाकले. यूट्यूबच्या कम्युनिटी नियमावली जगभरात लागू केल्या जातात. यांचे पालन न केल्यास व्हिडिओंवर किंवा चॅनल्सवर कारवाई केली जाते.