व्हाटसअ‍ॅपवर पिस्तुलसोबतचे फोटो टाकणे भोवले

pistol

जळगाव प्रतिनिधी । व्हाटसअ‍ॅपवर पिस्तुल सोबतचे फोटो टाकणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील वैभव अनिल कानडे आणि ईश्‍वर रायसिंग नाईक या दोन तरूणांनी आपल्या व्हाटसअ‍ॅप प्रोफाईलवर पिस्तुलसह फोटो टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी आज सायंकाळी या दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Protected Content