Home क्राईम विष घेवून तरूणाची आत्महत्या; टोळी बांभोरी येथील घटना

विष घेवून तरूणाची आत्महत्या; टोळी बांभोरी येथील घटना


Crime 21

धरणगाव (प्रतिनिधी) । तालुक्यातील टोळी बांभोरी येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने विषारी द्रव्य प्राषण करुन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्योती दीपक पाटील असे मृत तरुणीचे नाव आहे. ज्योतीची नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती. नेमके आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नव्हते.

गुरूवारी दुपारी तीची आई रत्नाबाई धरणगाव येथे समर्थांच्या बेठकीस गेली होती. तर वडील व भाऊ दुर्गादास हे दोघे शेतात मजुरीसाठी गेले होते. घरात एकटी असताना ज्योतीने विषारी द्रव्य प्राषण करुन आत्महत्या केली. दुपारी ३ वाजता तीची आई घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर कुटंुबिय, नातेवाईकांनी ज्योती हिला एरंडोल, धरणगाव येथील रुग्णालयात हलवले. परंतू, याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण मेहरे यांनी पंचनामा केला. यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह कुटंबियांच्या ताब्यात देण्यात आला.बप


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound