जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके गावाजवळ लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (वय- १६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. दुचाकीस्वार पुष्पल राजाराम गायकवाड (वय-२०, रा. विटनेर, ता. जळगाव) हा तरुण जखमी झाला. हा अपघात बुधवार, ३ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला आहे.
जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी असलेला चेतन वराडे हा युवक इयत्ता दहावीला असून तो व पुष्पल गायकवाड हे दोघेजण बुधवारी ३ जानेवारी रोजी दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्नाहून परतत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वावडदे ते विटनेर दरम्यान जळके गावाजवळ दुचाकी घसरली. त्यानंतर ती दुभाजकावर आदळली व दुभाजकावरील पत्र्याने चेतनच्या मानेची नस कापली गेली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या सोबतच पुष्पल यालाही मार लागला. अपघातानंतर मयत व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली.