Home Cities यावल यावल येथील तरुणाचा बुडून मृत्यू ?

यावल येथील तरुणाचा बुडून मृत्यू ?


da9f345b d47a 4665 bfcf 18cad0f57077

यावल (प्रतिनिधी) येथील एका तरूणाचा शेळगाव बॅरेजजवळ तापी नदीत पोहताना बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी (दि.२२) सायंकाळी ५.०० च्या सुमारास घडली. निलेश सुरेश निंबाळकर (वय १९) असे त्या तरुणाचे नाव असून तो शहरातील लहान मारुतीजवळ, देशमुख वाड्यातील रहिवासी आहे.

 

निलेश आज मित्रांसह शेळगाव रस्त्याने जळगावहुन यावलकडे येत असतांना या मार्गावर लागणाऱ्या तापी नदीत शेळगाव बॅरेजजवळ सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास पोहण्यास उतरला असता तो पोहताना अदृष्य झाला. असे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांचे म्हणणे आहे. बराच वेळ तो दिसुन न आल्याने तो बुडुन मरण पावला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलीसांनी घटनास्थळी जावुन पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने पाण्यात निलेश याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळुन आला नाही. उद्या पुन्हा पोलीस त्याचा शोध घेणार आहेत. रात्री उशिरापर्यंत निलेशचा मृतदेह सापडलेला नव्हता. दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. निलेशच्या अकस्मात मृत्यूमुले सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound