जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आहुजा नगरातील तरूण दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार, दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
रोहित रतन बागुल (वय-२२) रा. अहुजा नगर, जळगाव असे हरविलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “रोहित बागुल हा आपल्या कुटुंबियांसह अहुजा नगरातील वैष्णवी पार्क येथे वास्तव्याला आहे. गुरूवार १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता रोहित याने प्लॉट भागात फिरून येतो असे सांगून घरातून निघून गेला. रात्री उशीरापर्यंत रोहित हा घरी न आल्याने घरातील कुटुंबियांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली परंतू रोहित हा कुठेही आढळून आला नाही.
रोहितचा मोठा भाऊ जयेश बागुल याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.