रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुलरमध्ये पाणी टाकत असतांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने अजंदे गावातील तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी ११ जुलै रोजी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली हात आहे. याबाबत रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, रावेर तालुक्यातील लक्ष्मण संतोष पाटील (वय ३०) हा तरूण गुरूवारी ११ जुलै रेाजी दुपापरी दीड वाजेच्या सुमारास घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असतांना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जीवन बिरपन याने रावेर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.