धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावातील २६ वर्षीय तरूण धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना टाकळी फाटकाजवळ शुक्रवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सकाळी ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पंकज रमेश पाटील वय २६ रा. आव्हाणी ता. धरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात पंकज पाटील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. शुक्रवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास टाकळी फाटकाजवळ त्याने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पंकज पाटील हा युवक पाळधीत एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याच्या पश्चात लहान भाऊ विकी पाटील व आई असा परिवार आहे. वडिलांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे.