जळगाव प्रतिनिधी । शेतात उडीद-मूग काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा थ्रेशरमध्ये (मशीन) पाय अडकून जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी शेळगाव येथे 12.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जळगाव तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, विजय राजाराम कोळी (वय 36) रा. शेळगाव ता.जि.जळगाव हे शेतातील मिळेल ते काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. परंतू आज सकाळी शेळगाव शेत शिवारातील भूषण दिलीप पाटील यांच्या शेतावर रोजंदारीने हुडंबा (थ्रेशर) मशिनद्वारे उडीद मुंग काढण्यासाठी कामावर गेले होते. दुपारी १.३० वाजता मशीन सुरू केल्यानंतर मशीनवर चढत असतांना तरुणांचा तोल गेल्याने पाय मशीनमध्ये अडकल्याने त्याचा कमरेपासूनचा खालचा भागाचा चेंदामेंदा झाला आहे.
या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी सारला, मुलगा ओम, मुलगी प्रांजल, आई-वडील, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेका अनिल फेगडे करीत आहे.