जळगाव प्रतिनिधी । शहरातील सत्यम पार्क परिसरात काहीएक कारण नसताना चौघांनी तरुणास बेदम मारहाण केली. त्याच्या घरात तोडफोड करुन सोन्याचे मंगळसुत्र तोडून नुकसान केले.
१२ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. कुमार सुरेश पाटील (वय २९, रा. सत्यम पार्क) असे जखमी तरुणाचे नाव आहे. वैभव विठ्ठल पाटील (राजपूत), बापू पाटील (राजपूत), गजानन सुदाम निकम व गोलु सुर्यवंशी (सर्व रा. हिराशिवा कॉलनी) या चौघांनी कुमार याला मारहाण केली आहे. काहीएक कारण नसताना चौघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यात कुमारच्या हातावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याचे आई-वडील व भावास जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच कुमार याच्या घरातील खिडकी, दरवाजे तोडून इतर सामान इतरत्र फेकुन नुकसान केले. कुमारच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तोडून नुकसान करीत चौघे तेथुन निघुन गेले. याप्रकरणी कुमार याने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास पाटील तपास करीत आहेत.