यावल प्रतिनिधी । येथील फैजपुर मार्गावर असलेल्या एका बिअर बारवर रात्री जेवणासाठी गेलेल्या तरुणास तिन ते चार तरुणांनी मिळुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली असुन, जखमी तरूणास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील फैजपुर मार्गावर काल दिनांक ३० जुन रोजी रात्री ११.३० वाजता यावल येथील राहणारे राहुल बंडु गजरे ( वय४० वर्ष) हा भाग्यश्री बिअर बारवर जेवणासाठी गेला असता त्याच ठिकाणी आलेल्या तिन ते चार तरुणांनी मिळुन राहुल गजरे यांच्याशी वाद घालुन शिवीगाळ करून त्यांना बेदम मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत भाग्यश्री बिअर बार समोर राहुल गजरे यास निर्दयीपणाने फेकून ते निघून गेले.
या प्रकारामुळे यावल शहरातील कायदा सुव्यवस्थाही धोक्यात आली असल्याचे संकेत मिळाले असुन तिन चार दिवसापुर्वी देखील अशाच प्रकारे एका व्यक्तीस मारहाण करून त्याच्याकडील तीस ते पस्तीस हजार रुपयांची लुट करण्यात आली असल्याचीही माहीती समोर येत आहे. दरम्यान, शहरातील बिअर बार व हॉटेल्स सर्व नियम धाब्यावर बसवुन मध्य रात्री पर्यंत आपले हॉटेल व बिअर बारचे व्यवसाय करीत असल्याने या सर्व प्रकारामुळे शहरातील कायदा सुव्यव्यवस्था धोक्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी यांची तडकाफडकी बदली केल्याने या ठिकाणी तात्काळ यावल पोलीस स्टेशनला रिक्त असलेल्या पोलीस निरिक्षक म्हणुन सक्षम पोलीस अधिकार्याची नेमणुक करावी अशी मागणी यावलच्या नागरीकांकडुन करण्यात येत आहे. दरम्यान, काल रात्री झालेल्या मारहाण च्या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.