Home क्राईम ट्रॅक्टर बाजूला करण्याचे सांगण्यावरून तरूणावर प्राणघातक हल्ला

ट्रॅक्टर बाजूला करण्याचे सांगण्यावरून तरूणावर प्राणघातक हल्ला

0
109

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्यात उभा असलेला ट्रॅक्टर बाजूला घेण्याचे सांगितल्याच्या रागातून चार जणांनी मिळून एका व्यक्तीला लोखंडी सळईने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता आसोदा गावात घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल नारायण पाटील (वय ४२, रा. इंदिरानगर, आसोदा) हे मजुरी करून आपले कुटुंब चालवतात. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोपाल पाटील हे आसोदा गावातील आपल्या घरासमोरील गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या सार्वजनिक रस्त्यावरून जात होते. यावेळी संशयित आरोपी अविनाश विजय साळुंखे याने आपला ट्रॅक्टर रस्त्यात उभा केला होता, ज्यामुळे गोपाल पाटील यांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत होता.

गोपाल पाटील यांनी अविनाशला “तुझा ट्रॅक्टर मागे घे, मला घरी जायला रस्ता नाही” असे सांगितले. या रागातून संशयित आरोपी अविनाश साळुंखे याने रागाच्या भरात जवळ असलेली लोखंडी सळई काढून गोपाल पाटील यांच्यावर वार केला. हा वार गोपाल पाटील यांच्या हाताच्या बोटाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच अविनाशचे इतर साथीदार जयराज विजय साळुंखे, नामदेव साळुंखे आणि पद्माकर कमलाकर साळुंखे यांनीदेखील गोपाल पाटील यांना घेरले आणि शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सोपान पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound