जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला रामानंदनगर पोलीसांनी अटक केली असून २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात एक तरूण विनापरवाना गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाळे, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पो.ना. जितेंद्र तावडे, सागर देवरे, महिला पोलीस कर्मचारी स्वाती बागे, पो.कॉ. रविंद्र चौधरी यांनी शनिवार २ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी प्रविण विनोद शिंदे (वय-२१) रा. धनगरवाडा, हरीविठ्ठल नगर, जळगाव याला ताब्यात घेतले. त्याकडून २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस हस्तगत केले. याबाबत रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात पो.कॉ. रविंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रविण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.