Home राजकीय तुमचं हिंदुत्व हे अजानवालं – चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

तुमचं हिंदुत्व हे अजानवालं – चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
30

पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तुमचं हिंदुत्व हे अजानवालं आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केली आहे.

सावरकरांना समलिंगी म्हणल्यावर शांत बसणारे आहे, सत्ता इतकी वाईट असते हे मला माहित नाही असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे भाषण आक्रमक की आक्रस्ताळेपणाच? त्यांना कोणाबद्दल बोलायचंय हे माहित नाही. पण देशांतल्या हिंदूना माहिती आहे की बाबरीसाठी कोण होतं, कोणी गोळ्या झेलल्या. तुमचं हिंदुत्व हे अजान वालं आहे, सावरकरांना समलिंगी म्हणल्यावर शांत बसणारे आहे. सत्ता इतकी वाईट असते हे मला माहित नाही. अमोल मिटकरींच्या दोन क्लिप व्हायरल होत आहेत. त्यांनी बघायचं नाही हे ठरवलंय. बाळासाहेबांची आणि आदित्यची काय नक्कल केली आहे अमोल मिटकरींनी, असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.


Protected Content

Play sound