जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण -2016 / प्र.क्र.130/18 (र.व.का) दिनांक 24 ऑगस्ट, 2016 अन्वये नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी राज्यातील नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रार दखल करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पध्दतीने अशा तक्रारींचे 21 दिवसांचे आत तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले सरकार ही तक्रार निवारण प्रणाली शासनाने कार्यान्वीत केलेली आहे.
सदर तक्रार निवारण प्रणाली www.aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक 201608241430339207 असा आहे. तरी नागरिकांनी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले सरकार या ऑनलाईन् प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी कळविले आहे.