Home क्राईम कासारखेडे येथे आढळला तरूणाचा मृतदेह; घातपातची शक्यता

कासारखेडे येथे आढळला तरूणाचा मृतदेह; घातपातची शक्यता


Crime

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कासारखेडे येथील मांगीलाल रामू भिल (वय-28) यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस ठाण्यात कासारखेड येथील पोलीस पाटील प्रवीण पाटील यांचे खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान समाजाच्या वतीने मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील कासारखेड येथील मांगीलाल भिल यांचा कासारखेडे येथील मालोद रस्त्यावरील संभाजी मोतीराम पाटील यांचे खळ्यात मंगळवारी 9 एप्रिल रोजी दुपारी मृतदेह आढळून आला आहे. मरणाचे कारण समजू शकले नाही, येथील ग्रामीण रुग्णालयात यांची शवविच्छेदन करण्यात आले आहे. यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या नातेवाईकांसह समाज बांधवांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. आदिवासी ग्राम समितीच्या वतीने येथील पोलिस निरीक्षकांना समाज बांधवांच्या वतीने निवेदन देऊन मृत्यूबाबत कसून तपास करण्याची विनंती केली आहे. सपोनि सुजित ठाकरे हेड कॉन्स्टेबल संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound