जळगाव प्रतिनिधी । भावाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणाला चार जणांनी मारहाण करून तिक्ष्ण हत्यारानो गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा चार जणांवर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या पवन अरूण भोई (वय-२५) हा आपल्या भावासह राहतो. रविवारी ९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गल्लीतील शुभमन साहेबराव शिवदे, निखिल शिवदे, सागर बाळू शिवदे आणि सनी साहेबराव शिवदे यांनी पवन भोई यांच्या भावाला काहीही कारण नसतांना शिवीगाळ केली. त्यावेळी भाऊ रडत असल्याचे पाहून पवन भोई याने याचा जाब चौघांना विचारला, याचा राग आल्याने चौघांनी पवन भोई याला पाठीपागे तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. दोन्ही भावांना बेदम मारहाण व शिवीगाळ करून बंदुकीच्या गोळीने ठार मारण्याची धमकी दिली. जखमी पवन भाई याला तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. पवन भोई याच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री उशीरा चौघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करत आहे.