Home क्राईम तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील हंबर्डी गावात एका विवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नितीन सुधाकर मेढे (वय ३४, रा. हंबर्डी, ता. यावल) या विवाहित तरुणाने ५ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या छताला नायलॉन पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. घरातील सदस्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, नितीन मेढे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांनी केले. या प्रकरणी सुरेश बाळू मेढे यांनी दिलेल्या खबरवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे हंबर्डी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचे नेमके कारण काय याचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.


Protected Content

Play sound