
अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला लाकडी फळीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण गावात पंकज अशोक बोरसे वय २९ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. गावात राहणारे निंबा बाळू पाटील, बाळू विक्रम पाटील आणि कल्पनाबाई बाळू पाटील यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सोमवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता लाकडी फळीने पंकज बोरसे याला बेदम मारहाण करून दुखापत केली. या मारहाणीत पंकजचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी पंकज बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात मारहाण करणारे निंबा बाळू पाटील, बाळू विक्रम पाटील आणि कल्पनाबाई बाळू पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सुर्यवंशी हे करीत आहे.



